Aaliya Siddiqui  
Latest

Aaliya Siddiqui : नवाजुद्दीनची पत्नी नव्या मित्राचा फोटो शेअर करत म्हणाली, ‘हा माझा…’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याची पत्नी आलिया सिद्दीकी ( Aaliya Siddiqui ) यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू आहे. दोघांचा हा वाद कोर्टात घटस्फोटोपर्यत पोहोचला आहे. आलियाने नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर दोघांच्यातील भांडण जगासमोर आले होते. दरम्यान आता आलियाने तिच्या नव्या पार्टनरसोबतचा फोटो शेअर केल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चांना उधान आलं आहे.

अभिनेत्री आलिया सिद्दीकीने ( Aaliya Siddiqui ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या मित्रांसोबत फोटो शेअर केला आहे. यानंतर ती सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. आलियाने स्वत: च नव्या पार्टनरसोबतचा फोटो शेअर केल्याने चाहत्यांनी त्याच्या रिलेशनशीपची चर्चांना जोर धरलाय. या फोटोत आलिया ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये तर तिच्या बॉयफ्रेंड ब्ल्यू करलच्या शर्टमध्ये दिसला. याशिवाय दोघेजण कॉफी शॉपमध्ये असून आलियाच्या हातात कॉफी मग दिसतोय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'मी ज्या नात्याला मनापासून जपण्याचा प्रयत्न केला होता त्याच नात्यातून बाहेर पडण्यासाठी मला १९ वर्षे लागली. परंतु, शेवटी मी त्यातून बाहेर पडत आहे. आता काही दिवसांचा प्रश्न आहे. यानंतर माझी मुलं ही माझी पहिली प्राथमिकता असतील.मात्र, काही नातीही मैत्रीच्या पलीकडेही जातात. दरम्यान मला नवा पार्टनर मिळाला आहे याचा मला खूप आनंद झाला आहे. मलाही आनंदी राहण्याचा अधिकार नाही का?'. असे तिने म्हटलं आहे.

दरम्यान आलियाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, 'मी आता आयुष्यातून पुढे गेले आहे. नव्या पार्टनरसोबतचे नाते मैत्रीपेक्षा वेगळे आणि खास आहे. स्वतःचे जीवन माझ्या मुलांसोबत जगायचे आहे. मला माझ्या मुलांना कोणतीही प्रकारचा त्रास होवू द्यायचा नाही. आमच्यातील नाते एक आदराचे नाते आहे.' असेही तिने म्हटले आहे.

आलियाने मित्राचे केलं कौतुक

आलियाने मित्राचे कौतुक करताना म्हटलं आहे की, 'त्याच्या बुद्धिमत्तेने मी खूपच प्रभावित झालो आहे. तो माझा खूप आदर करतो आणि माझी खूपच काळजी घेतो. माझा मित्र भारताचा नसून इटलीचा आहे. याआधी आम्ही दुबईत भेटलो होतो आणि तेव्हापासून आमच्यात एक चांगली मैत्री होती. त्याला ओळखायला मला थोडा जास्त वेळ लागला.'

दरम्यान आलियाने तिच्या नव्या पार्टनरच्या नावाचा खुलासा केलेला नाही. आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच काही नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला पाठींबा दिला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT