पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगत बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. २४) पत्रकार परिषदेत दिला.
शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. बियाण्यांचा राज्यात तुटवडा भासणार नाही. कुणाला भेटल्याने निवडणूक जिंकता येत नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर दिला.
हेही वाचा