सायरस मिस्त्री  
Latest

Cyrus Mistry : टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटा समुहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे निधन झाले. आज (दि. ४) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळील चारोटी येथे दुभाजकावर कार आदळली. त्यांच्या गाडीमध्ये चार जण होते. या अपघातात मिस्त्री यांच्यासह आणखी एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती पालघरचे जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बाेलताना दिली.

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) हे मर्सिडिस गाडीतून अहमदाबादवरुन मुंबईला येत असताना हा अपघात झाल्याचे पाटील यांनी सांगितले. दुभाजकाला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांची २०१२ साली टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ साली त्यांनी या पदावरुन हटविण्यात आले होते. या संदर्भात सायरस मिस्त्री यांनी या निर्णयास आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मार्च २०२१ मध्ये याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सायरस मिस्त्री यांच्या विरोधात निकाल दिला होता. या निकालाचा पुनर्विचार केला जावा, अशी याचिका सायरस मिस्त्री यांच्यातर्फे शापूरजी पालोनजी समुहाने दाखल केली होती. मात्र पुन्हा न्यायालयाने आपला पुर्वीचाच निकालास योग्य ठरवले हाेते.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT