अबू आझमी 
Latest

Abu Azmi: अबू आझमी यांना व्हॉट्सअ‍ॅपवर जीवे मारण्याची धमकी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांना व्हॉट्सअ‍ॅपवर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यासंदर्भात आझमी यांनी मुंबईच्या कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी अबू आझमी यांना धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआय ने दिले आहे.

याबाबत बोलताना आझमी यांनी म्हटले आहे की, हे माहाशय मला तीन दिवसांपासून फोनवर आणि व्हाट्सअप वर धमकी देत आहेत. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना आमदार अबू आझमी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून टॅग केले आहे. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंती ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT