aamir khan  
Latest

Aamir Khan : आमिर खानच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी आता आनंदाची लहर आलीय. मागील वर्षी त्याची मुलगी इरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबत साखरपुडा केला होता. आता यानंतर (Aamir Khan) लग्नपत्रिकेसोबतचे काही फोटो समोर आले आहेत. इराने आपल्या डायरीतून काही फोटो शेअर केले आहेत. तिने नुपुर शिखरसह अन्य घरातील मंडळींचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. एका फोटोत फातिमा सना शेख आणि किरण राव यांचीही झलक दिसतेय. (Aamir Khan)

इराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर २०२३ मधील काही सुंदर फोटोंची सीरीज शेअर केली आहे. यामध्ये इरा आणि नुपूरचे अनेक फोटो आहेत. एका फोटोत फातिमा सना शेख मोठा विग घातलेली दिसते. दुसऱ्या फोटोमद्ये इरा शांतपणे कार्डवर आपले नाव लिहिताना दिसते.

नुपुर शिखर आणि इरा खानने १८ नोव्हेंबर, २०२२ रोजी साखरपुडा झाला होता. दोघे दीर्घकाळ एकमेकांना डेट करत आहेत. इराने सोशल मीडियावर माहिती दिली होती की, नूपुरचे प्रपोजल स्वीकारले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT