katerina kaif honoured by adesh bandekar  
Latest

पैठणी देऊन आदेश बांदेकर भावोजींनी केला कॅटरीना कैफचा सन्मान

स्वालिया न. शिकलगार

आदेश बांदेकर यांनी 'होम-मिनिस्टर' या कार्यक्रमाद्वारे गेली १७ वर्ष तमाम वहिनींचा सन्मान केलाय. महाराष्ट्राचं महावस्त्र 'पैठणी' देऊन त्यांनी वहिनींचा सत्कार केलाय. यावेळी झी मराठी ॲवॉर्ड्स २०२१ मध्ये बांदेकर भावोजींनी चक्क एका बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पैठणी देऊन सन्मान केला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कॅटरीना कैफ आहे. नुकतंच संपन्न झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात कॅटरीना कैफने हजेरी लावली.

कैफ आणि रोहित शेट्टी यांनी त्यांच्या आगामी सूर्यवंशी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. कॅटने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने सर्वांनाच भूरळ पाडलीय. फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगभरातील तिच्या चाहत्यांना भुरळ पडली आहे.

कार्यक्रमात भावोजींनी कॅटचं स्वागत अगदी मराठमोळ्या पद्धतीत, महाराष्ट्राचं महावस्त्र तिला भेट देऊन केलं. इतका मोठा सन्मान दिल्याने त्या क्षणी कॅट भारावून गेली. तिच्या चेहऱ्यावरील आनंदचं सगळं काही सांगून जातो. हा सोहळा आणि हा सन्मान क्षण प्रेक्षकांना शनिवार ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये पाहायला मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT