Latest

Suicide Blast In Islamabad : इस्लामाबादमध्ये आत्मघातकी स्फोटात पोलीस ठार : ६ जण जखमी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका आत्मघातकी स्फोटात (Suicide Blast In Islamabad) एक पोलीस कर्मचारी ठार झाला आहे. तर ४ पोलिसांसह ६ जण जखमी झाले आहेत. या स्फोटात मृत्यू झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे अदील हुसेन असे नाव आहे. इस्लामाबादच्या फेडरल कॅपिटलच्या सेक्टर I-10 मध्ये हा आत्मघातकी स्फोट आज (दि.२३) झाला. एएनआयने पाकिस्तानच्या आर्य न्यूजचा हवाला देत हे वृत्त दिले आहे.

स्फोटानंतर  (Suicide Blast In Islamabad) पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ धाव घेत जखमींना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात दाखल केले आहे. इस्लामाबाद ऑपरेशन्सचे पोलीस उपमहानिरीक्षक सोहेल जफर चठ्ठा यांनी सांगितले की, पोलिसांनी संशयास्पद कार थांबवली. या कारमध्ये एक पुरुष आणि महिला होती. या आत्मघातकी हल्लेखोराने स्फोट घडवून आणला.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT