पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) 55 व्या बैठकीत एका काश्मिरी नेत्याने पाकिस्तानच्या शिया मुस्लीम अल्पसंख्याकांचा मुद्दा उपस्थित केला. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या या बैठकीमध्ये या आपलं मत मांडणाऱ्या या काश्मिरी नेत्याचे जावेद बेग असे नाव आहे. बेग यांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतात वसलेल्या पाकिस्तानच्या कुर्रम जिल्ह्यातील पाराचिनारच्या शिया पश्तून आदिवासींना भेडसावलेल्या भीषण परिस्थितीवर प्रकाश टाकला.
बेग यांच्या X वरील एका पोस्टमध्ये, त्यांनी UNHRC मधील त्यांनी मांडलेल्या प्रश्नाचा काही भाग शेअर केला आहे. यामध्ये प्रश्न मांडत असल्याचा एक व्हिडिओ आहे. यामध्ये म्हटले, यामध्ये पाकिस्तानमधील शिया मुस्लिमांच्या मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होत असल्याच्या मुद्द्याला अधोरेखित केले आहे. त्यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात असलेल्या पाराचिनारच्या पश्तून शिया लोकांच्या दुर्दशेचा मुद्दा जोरदारपणे मांडला. मात्र हे सांगत असताना त्यांनी पाकिस्तानमधील सद्यस्थितीपेक्षा जम्मू काश्मिर मधील परिस्थिती वेगळी असल्याचेही अधोरेखित केले आहे. परंतु जम्मू आणि काश्मीरमधील प्रगती आणि आंतरधर्मीय सलोखा यांच्याशी तुलना केल्याबाबतचा कोणता उल्लेख नाही. मात्र यामध्ये 'भेट भूमी' असा उल्लेख केल्याने पाकिस्तानचा जम्मू काश्मीर सोबत तुलना केल्याचा तर्क अनेकांनी मांडला आहे.
भारतीय काश्मिरी मुस्लिम जावेद बेग यांनी कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील प्रगतीचा विरोध करताना पाकिस्तानमधील शिया लोकांवर होणाऱ्या अत्याचारांकडे लक्ष वेधले आहे. बेग म्हणतात की, "आज पाकिस्तानच्या पंजाब मधील शिया मुस्लीम यांच्याबाबतीत सततच्या वाढत्या धार्मिक कट्टरपंथीयतेमुळे हिंसाचारात सापडले आहेत. यामध्ये शियाविरोधी धार्मिक संघटनांचा समावेश आहे.
बेग म्हणतात की, काश्मीरमधील मुस्लिम लोकसंख्येमध्ये शिया अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करतात, ज्यात अंदाजे 15-20% आहे. ते शिया इस्लामचे पालन करतात, जे धार्मिक पद्धती आणि विश्वासांमध्ये सुन्नी इस्लामपेक्षा वेगळे आहेत. पाकिस्तानमध्ये या दोन मुस्लिम गटांमध्ये अनेकदा तणाव निर्माण होतो. भू-राजकीय बदलांच्या दरम्यान अल्पसंख्याक समुदायांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकून, बेगच्या खुलाशांनी प्रदेशातील जटिल धार्मिक गतिशीलतेवर प्रकाश टाकला. त्यांची वकिली धार्मिक सहिष्णुता आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित करते ज्यामुळे प्रदेशात सुसंवाद आणि स्थिरता वाढीस लागते.
हेही वाचा