Latest

Karnataka News | धक्कादायक! वाळू माफियांनी हेड कॉन्स्टेबलला ट्रॅक्टरखाली चिरडले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील कलबुर्गी (Kalaburagi Karnataka) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गुरुवारी सायंकाळी ड्युटीवर असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलला वाळू माफियानी ट्रॅक्टरखाली चिरडून मारले. जेवरगी तालुक्यातील नारायणपूरजवळ अवैधरित्या वाळू उत्खनन करणार्‍या ट्रॅक्टरला रोखण्याचा प्रयत्न नेलोगी पोलिस ठाण्याच्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने केला असता ही घटना घडली. यात ५१ वर्षीय कॉन्स्टेबल म्हैसूर चौहान यांचा मृत्यू झाला. (Karnataka News)

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हेड कॉन्स्टेबलने तपासणीसाठी ट्रॅकर थांबविण्याचा प्रयत्न केला. पण ट्रकर थांबला नाही. चालकाने ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर घालून भरधाव वेगाने तो पुढे नेला. यामुळे कॉन्स्टेबचा जागीच मृत्यू झाला.

कलबुर्गी येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ड्रायव्हर सिद्धना याला अटक केली आहे. ट्रक वाळूची वाहतूक करत असून अशा कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस गस्तीवर होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

या घटनेची कर्नाटक सरकारने गंभीर दखल घेतली आहे. बेकायदा वाळू उत्खननावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मी पुन्हा एकदा पोलीस खात्याला दिले आहेत. या घटनेची चौकशी केली जाईल, असे राज्यमंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले.

ही अतिशय धक्कादायक घटना आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे कर्नाटकचे मंत्री डॉ. एम सी सुधाकर यांनी म्हटले आहे. स्थानिक वृत्तानुसार, नारायणपूर येथील स्थानिकांकडून अवैध वाळू वाहतुकीबाबत पोलिसांना अनेक तक्रारी आल्या होत्या. या भागात हेड कॉन्स्टेबल म्हैसूर चौहान यांना वाळूच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्युटीवर तैनात केले होते. (Karnataka News)

दरम्यान, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की चौहान हे मोटरसायकल चालवत असताना त्यांना ट्रॅक्टरने धडक देऊन खाली पाडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौहान हे कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यातील रहिवाशी आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT