Latest

सांगली : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार

backup backup

ऊस तोडणीसाठी निघालेल्या ऊस कामगार टोळीतील 4 वर्षांच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केला. संबंधित चिमुरड्याला रस्त्यावरून उचलून उसाच्या शेतात नेत त्याच्या नरड्याचा चावा घेत ठार केले. येणके (ता.कराड) येथे सोमवारी (दि. 15) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेनंतर वन विभागाविरोधात येणके व परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आकाश दिगांश भिल (वय 4, रा.कात्रा, ता.धडगाव, जि.नंदूरबार) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील कात्रा येथील ऊस तोडणी कामगारांची काही कुटुंबे येणके येथे ऊस तोडणीसाठी आली आहेत. सोमवारी सकाळी 7 च्या दरम्यान रयत सहकारी साखर कारखान्याकडे ऊस तोडणीचे काम करणार्‍या टोळीमध्ये दिगांशा गेदा भिल व चिन्या दिगांशा भिल हे पती पत्नीचे जोडपे ऊस तोडणी मजुराचे काम करत होते. ते अन्य मजुरांबरोबर ऊस तोडणीसाठी येणके-किरपे रस्त्याने निघाले असता चिन्या भिल ही महिला इतरांच्या पाठीमागे काही अंतरावरून आपल्या लहान मुलाला कडेवर व आकाश नावच्या 5 वर्षे वयाचा मुलाला बरोबर घेऊन चालत निघाली होती. त्यावेळी इनाम नावाच्या शिवाराजवळ उसाच्या शेतीतून अचानक बिबट्याने झेप घेऊन आईच्या समोरच आकाशची मान जबड्यात पकडून ऊसाच्या शेतात धुम ठोकली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या आईने आरडाओरडा केला. तेव्हा ऊसतोड टोळीतील कामगार व स्थानिक ग्रामस्थ तेथे जमा झाले. त्यांनी उसाच्या शिवारात शोधाशोध सुरू केली असता आकाशला सोडून बिबट्या पळून गेला.दरम्यान वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. मृत बालकाच्या कुटुंबियांना शासन नियमानुसार 15 लाख रूपये भरपाई देण्यात येणार आहे.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT