अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन; गुजरातमधील नवसारी येथे शनिवारी सकाळी बस आणि एसयूव्ही कार यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३२ जखमी झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ४८ वर वेसमा गावाजवळ घडला. एका वृत्तानुसार, बस चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसची कारला धडक बसली. (Gujarat Navsari Accident)
नवसारी येथे अहमदाबाद-मुंबई महामार्गावर बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एका गंभीर जखमीला सुरत येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती नवसारीचे पोलीस उपअधीक्षक व्हीएन पटेल यांनी दिली आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी केतन जोशी यांनी सांगितले की ३२ जखमींपैकी १७ जणांना वलसाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर १४ जणांना नवसारी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि अन्य जखमींना उपचारासाठी सुरत येथे नेण्यात आले. घटनास्थळी पोलिसांना नऊ मृतदेह आढळून आले आहेत. एसयूव्ही (फॉर्च्यूनर) कारमधून नऊ जण प्रवास करत होते. ते एका फर्मचे कर्मचारी आहेत. बस अहमदाबादहून वलसाडला जात होती. (Gujarat Navsari Accident)
हे ही वाचा :