file photo 
Latest

Nepal Accident update | नेपाळमधील अपघातात ६ भारतीय भाविकांसह ७ जणांचा मृत्यू

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळच्या दक्षिणेकडील बारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात ६ भारतीय भाविकांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर १९ जण जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे.

Nepal Accident update : ६ भारतीय भाविकांसह १ नेपाळी मृत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस काठमांडूहून जनकपूरला जात होती.  भारतीय भाविकांना घेऊन जात असताना बारा येथील चुरियामाईजवळ हा अपघात झाला. "पहाटे 2 च्या सुमारास पूर्व-पश्चिम महामार्गालगत सिमरा उप-महानगर शहर-22 येथे चुरियामाई मंदिराच्या दक्षिणेला नदीच्या काठावर बस उलटली आणि रस्त्याच्या 50 मीटर खाली पडली," असे उपअधीक्षक प्रदीप बहादूर छेत्री यांनी माहिती दिली. राजस्थान राज्यातील मृत भारतीय नागरिकांची पोलिसांनी ओळख पटवली आहे. या अपघातात एका नेपाळी नागरिकाचाही मृत्यू झाला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. बसमध्ये दोन ड्रायव्हर आणि एका हेल्परसह एकूण २७ जण होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT