Latest

सातारा : लोकसभा-विधानसभा निवडणुकीची चाहूल

दिनेश चोरगे

सातारा : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 4 हजार 800 मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. या मतदान यंत्रणांचे फर्स्ट लेव्हल चेकिंग (एफएलसी) दि. 25 रोजी सकाळी 9 वाजता एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी मतदान यंत्रांची पाहणी सोमवारी केली.

जिल्ह्यात विधानसभा मतदार संघाची सुमारे 2 हजार 996 मतदान केंद्रे असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात बेंगलोर येथून भारत इलेक्ट्रिक लिमिटेड (बेल) या कंपनीकडून सातार्‍यात मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. ही मतदान यंत्रे सातारा एमआयडीसीत वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. मतदान यंत्रांमध्ये 7 हजार 791 बॅलेट युनिट, 4 हजार 673 कंट्रोल युनिट, 4 हजार 837 व्हीव्हीपॅट मशिनचा समावेश आहे. या मतदान यंत्रांच्या तपासणीचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी नीता शिंदे यांच्या सुचनेनुसार मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी होत आहे. त्यासाठी 20 अभियंते दाखल होणार आहेत. शिवाय उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, अव्वल कारकून यांच्याही टीमची व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान, गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मतदान यंत्रांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, सातारा तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार विजयकुमार धायगुडे उपस्थित होते.

राजकीय पक्ष प्रतिनिधींना आवाहन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे सातार्‍यात दाखल झाली आहेत. मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय तपासणीसाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे व माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

       हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT