Latest

बाल लैंगिक शोषण सामुग्री : मध्य प्रदेशातील ४००० संशयित पोलिसांच्या रडारवर | NCMEC CyberTipline

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील ३० हजार जणांनी बाल लैंगिक शोषण संबंधित सामग्री वितरित केल्याचे अमेरिकेतील National Center For Missing and Exploited Children (NCMEC) या संस्थेने शोधले आहे. आता यातील ४ हजार संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. यात पॉर्न, लैंगिक शोषणासाठी उद्युक्त करणारी सामग्रीचा समावेश आहे. (NCMEC CyberTipline)

मध्य प्रदेश पोलिसांनी यातील ४ हजार लोकांना अटक करण्याची तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेश पोलिसांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून NCMEC CyberTipline कडून ही माहिती मिळाली. उर्वरित २६००० प्रकरणाची छाननी सुरू आहे. ज्या लोकांना अटक केली जाऊ शकते अशांची यादी राज्याच्या सायबर विभागाने १० जिल्ह्यांना पाठवली आहे, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

Child Sexual Abuse Material (CSAM)चे वितरण केल्या प्रकरणांची यात तपशील आहे. ४००० पैकी फक्त इंदूरमध्येच २००० प्रकरणं आहेत. भोपाळमध्ये १ हजारापेक्षा जास्त लोक यात गुंतले असल्याचे दिसून आले आहे. NCMEC ही अमेरिकेतील यंत्रणा मुलांच्या शोषणावर लक्ष ठेवत असते. ही संस्था CyberTipline Reports बनवते. भारतातील नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २९ फेब्रुवारी २०१९ला NCMECसोबत करार केला असून CyberTipline Reports भारतीय तपास संस्थांना उपलब्ध होतो.

CybeTipline मध्ये इंटरनेटवर होणारे बाल लैंगिक शोषण, चाईल्ड पॉर्नोग्राफी, मुलांच्या लैंगिक शोषणाला उत्तेजन देणारी सामुग्री, बाल वेश्या, बालकांची विनयभंग अशा विविध गुन्ह्यांची माहिती जमवते. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. ही माहिती गुन्हेगारांवर कारवाईसाठी उपयोग पडते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT