आमिर खान, शरमन जोशी आणि आर माधवन 
Latest

3 Idiots : जेव्हा थ्री इडियट्स एकत्र भेटतात; राजू, फरहान आणि रँचो (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ३ इडियट्स बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये आमिर खान, शरमन जोशी आणि आर माधवन यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपट ३ इडियट्समध्ये या तिन्ही कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली होती. (3 Idiots) चित्रपटामध्ये आमिर खानने रँचो, शरमन जोशीने राजू रस्तोगी आणि आर माधवनने फरहान कुरैशीची भूमिका साकारली होती. चित्रपट ३ इडियट्स २००९ मध्ये रिलीज झाला होता. आता तब्बल १३ वषांनंतर रँचो, राजू रस्तोगी आणि फरहान कुरैशी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. (3 Idiots)

शरमन जोशीने त्याचा गुजराती चित्रपट कॉन्ग्रचुलेशन्सचे प्रमोशन केले. त्याने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शरमन जोशीसोबत अभिनेता आमिर खान आणि आर माधवन दिसत आहेत. ते दोघे येऊन व्हिडिओमध्ये शरमन जोशीला विचारतात की, तो हा व्हिडिओ का करत आहे? अभिनेता शरमन म्हणतो की, त्याचा चित्रपट येत आहे. यानंतर तिघे मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत. सोशल मीडिया पर आमिर खान, शरमन जोशी आणि आर माधवन यांचा हा व्हिडिओ होत आहे.

हा व्हिडिओ पाहून फॅन्स ३ इडियट्सच्या सीक्वेलची मागणी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT