अटक  
Latest

मुंबई : ताज हॉटेलजवळ घातक शस्‍त्रांसह ३ जणांना अटक

निलेश पोतदार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ताज हॉटेलजवळ संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या एका कारचा पाठलाग करून मुंबई पोलिसांनी तलवारी, बटण चाकू, लोखंडी रॉड आणि अन्य धारदार वस्तू अशी घातक शस्त्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जसपालसिंग संधू (वय ४०), सूरज गणेश म्हात्रे (२३) आणि राजकमल दलेर सिंग (३५) यांना बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेचे अंमलदार किरण सूर्यवंशी हे रविवारी रात्री शहीद भगतसिंग रोड येथे कर्तव्य बजावत होते. त्यांना काळ्या काचा असलेली एक पांढऱ्या रंगाची कार ताज हॉटेलजवळ संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. कारला काळ्या काचा असल्याने वाहतूक नियमांनुसार कारवाई करण्यासाठी सूर्यवंशी यांनी कार चालकाला थांबण्याचा इशारा केला. पण, कार चालकाने गाडी थांबवण्याऐवजी गाडीचा वेग वाढवून पळ काढला.

सुर्यवंशी यांनी याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाला देत दुचाकीवरून या कारचा पाठलाग सुरु केला. कार रेडिओ क्लबजवळ पोहचताच सूर्यवंशी यांनी कुलाबा पोलिसांनाही याची माहिती देत मदत मागितली. पुढे ही कार मुकेश मिल कंपाऊंडच्या डेड एंडजवळ थांबली. त्यानंतर सूर्यवंशी यांनी कुलाबा पोलिसांच्या मदतीने कारची झडती घेतली असता, २७ इंचाच्या दोन आणि नऊ इंचाची एक अशा तीन तलवारी, वेगवेगळ्या आकाराचे तीन चाकू, एक बटन चाकू, लोखंडी रॉड आणि काठ्या सापडल्या.

कुलाबा पोलिसांनी कारसह कारमध्ये असलेल्या जसपालसिंग संधू, सूरज म्हात्रे आणि राजकमल दलेर सिंग यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तिघांनीही नवी मुंबईतील कळंबोली येथील वाहतूकदार असून, कामानिमित्त मुंबईत आलो होतो. कारमध्ये असलेली शस्त्रे त्यांच्या स्व-संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

काही लोकांनी यापूर्वी त्यांच्यावर हल्ला केला होता आणि ते स्वत:चा बचावही करू शकले नाहीत. म्हणून त्यांनी स्व-संरक्षणासाठी गाडीत हत्यारे ठेवल्याचे पोलीस तपासात सांगितले. या तिघांवर शस्त्रास्त्र कायदा आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय हातिसकर यांनी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT