आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केलेल्या प्रारूप मतदार यादीत सुमारे 23 लाख नव्या मतदारांची भर पडली आहे. या नवीन मतदारांमुळे राज्यातील मतदारांची संख्या 9 कोटी 13 लाख 42 हजार 363 इतकी झाली आहे. नोव्हेंबर 2021 च्या प्रारूप मतदार यादीप्रमाणे राज्यात 8 कोटी 96 लाख 41 हजार 191 मतदारांची संख्या होती. यामध्ये 4 कोटी 68 लाख 49 हजार 525 पुरुष, 4 कोटी 27 लाख 89 हजार 93 महिला आणि 2,573 तृतीयपंथी मतदार यांचा समावेश होता.
डिसेंबर 2021 रोजी मतदारांकडून नव्याने हरकती आणि दावे मागविण्यात आले. तसेच नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी अभियान राबविण्यात आले. या अभियानानंतर मतदार यादीत 12 लाख 12 हजार 325 पुरुष मतदार, 11 लाख 21 हजार 534 महिला मतदार आणि 984 तृतीयपंथीय मतदारांची वाढ झाली. यामुळे 23 लाख 34 हजार 843 नव्या मतदारांची भर
पडली.
अनेक मतदार मयत किंवा स्थलांतरित झालेले असतात. त्यामुळे काही ठिकाणी डबल मतदार नोंदणी होत असते. या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येतात. यावेळी यादीतून 3 लाख 44 हजार 27 पुरुष मतदार, 2 लाख 89 हजार 607 महिला, तर 37 तृतीयपंथीय मतदारांना वगळण्यात आले. वगळण्यात आलेल्या एकूण मतदारांची संख्या 6 लाख 33 हजार 671 इतकी आहे.
नवीन प्रारूप मतदार यादीनुसार सध्या राज्यात 4 कोटी 77 लाख 17 हजार 823 पुरुष मतदार, 4 कोटी 36 लाख 21 हजार 20 महिला आणि 3,520 तृतीयपंथीय मतदारांची संख्या नोंदवण्यात आली आहे. यानुसार सध्या राज्यात 9 कोटी 13 लाख 42 हजार 363 इतकी मतदारसंख्या झाली आहे.
हे ही वाचा