Latest

Food Stock Seized : नागपुरात तब्बल २० लाखांचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त

backup backup

नागपुर; पुढारी वृत्तसेवा : अन्न व औषध प्रशासनाने नागपुरात (Nagpur) राबविलेल्या मोहिमेत तब्बल २० लाख रूपयांचा अन्नपदार्थांचा संशयीत भेसळयुक्त साठा जप्त (food stock seized) केला आहे. नागपुरात १६ ठिकाणी धाड टाकण्यात आली. यामध्ये १० हजार ८८३ किलो वजनाच्या अन्नपदार्थांचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत २० लाख १९ हजाराच्या घरात आहे. यात तेलापासून वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे.

दिवाळीच्या काळात अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपूरमध्ये धडक मोहीम राबवते. जवळपास वीस लाखांचा अन्नपदार्थांचा भेसळयुक्त साठा जप्त (food stock seized)  केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अन्न पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. मात्र, त्याचा फायदा काही व्यापारी घेतात. भेसळयुक्त माल बाजारात आणतात. यावर लक्ष ठेवत अन्न व औषध विभागाने ही विशेष मोहीम राबवली.

या जप्त केलेल्या अन्नपदार्थांचा नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. आता अन्न व औषधी प्रशासन विभाग अहवालाची वाट पाहत आहे. अशी माहिती अन्न व औषधी विभागाने दिली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT