Latest

आम आदमी पक्ष पंजाबमध्ये नवा इतिहास रचणार, विधानसभेला लाभणार पहिल्या महिला सभापती

backup backup

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : दिल्लीनंतर आम आदमी पक्ष पंजाबमध्ये सत्ता मिळवत नवा इतिहास रचला आहे. आपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार भगवंत मान उद्या १६ मार्चला शहीद भगतसिंह यांच्या गावात जात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आपवर पंजाबच्या जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी त्यांनी एक नवीन पाऊल टाकले आहे.

आपच्या आमदार सरबजीत कौर यांना महिला सभापतीचा बहुमान देत नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. दरम्यान सभापतीच्या शर्यतीत बलजिंदर कौर यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.

पंजाब विधानसभेच्या पहिल्या महिला स्पीकर बनण्याच्या शर्यतीत सरबजीत कौर पुढे आहेत. याचबरोबर आम आदमी पक्ष कार्यकारणीत बलजिंदर कौर यांच्या नावाचीही चर्चा सूरू आहे. उद्या केवळ भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते नवनशहर जिल्ह्यातील शहीद भगतसिंग यांचे मूळ गाव असलेले खटकर कलान येथे शपथविधी सोहळा होणार आहे. यानंतर पंजाबमध्ये आपचे नवे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येणार आहे.

आम आदमी पार्टी आपल्या आमदारांसाठी खास योजना बनवत आहे. पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या आमदारांसाठी आम आदमी पार्टीकडून प्रशिक्षण देण्याच्या तयारीत आहे. पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ११७ जागांवर निवडणूक लढवत ९२ जागा मिळवल्या. आपने दिल्ली नंतर पंजाबमध्ये सत्ता मिळवली आहे.

पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आपला राज्यसभेतही मोठा फायदा होणार आहे. येत्या ३१ मार्चला पंजाबमधून राज्यसभेच्या खासदारांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 'आप'कडे असलेले बहुमत पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेत एकूण सात जागा पंजाबमधून निवडल्या जातात. त्यातील पाच जागांसाठी ३१ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT