Latest

Sir J J Hospital : सर जे. जे. रुग्णालयात आढळले ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुने भुयार (Photo)

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबईतील जे. जे. रुग्णालय (Sir J J Hospital) परिसरात असणा-या डी. एम. पेटीट नावाच्या सुमारे 130 वर्षे जुन्या इमारतीमध्ये एक भुयार सापडले. हा भाग नर्सिंग कॉलेजचा आहे. बुधवारी रुग्णालय परिसराची पाहणी करत असताना निवासी वैद्यकिय अधिका-यांना संशयास्पद गोष्टीचा अंदाज आला. ज्यानंतर त्यांनी कुतूहलाचा भाग म्हणून तिथे असणारे झाकण काढण्याचा प्रयत्न केला. झाकण निघताच तिथे काहीशी पोकळी असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर पाहिले असता तिथे २०० मीटर लांब भुयार आढळून आले.

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, सुरुवातील या इमारतीमध्ये पाण्याची गळती असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्या नंतर नर्सिग कॉलेजच्या संपूर्ण इमारतीची तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या दरम्यान इमारतीच्या तळमजल्यात काही गूढ गोष्टींचा अंदाज आला. त्या ठिकाणी एक झाकण निदर्शनास आले. तेथील अधिकाऱ्यांनी ते झाकण उघडले त्यावेळी त्यांना आत पोकळी असल्याचे निर्दनास आले. त्या ठिकाणचा आणखी तपास केला असता त्या ठिकाणी २०० मीटर लांब भुयार आढळून आले. पीडब्लुडीचे अभियंते आणि सुरक्षा रक्षकांकडून करण्यात आलेल्या सर्वेवेळी या ठिकाणी कोणशिला आढळून आला. या कोणशिलेवर १८९० सालाचा उल्लेख आहे. (Sir J J Hospital)

या इमारतीचे बांधकाम ब्रिटिशांकडून करण्यात आलेले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले की, या पुर्वी या इमारतीचा वापर हा महिला व बालकांच्या उपचारासाठी वापर केला जात होता. त्यानंतर या इमारतीचा वापर हा नर्सिंग महाविद्यालयसाठी करण्यात येऊ लागला. 2016 मध्ये मुंबईतील मलबार हिल येथील राजभवनात ब्रिटिशकालीन बोगदा सापडला होता. येथे 500 वर्षे जुना बंकरही सापडला होता. (Sir J J Hospital)

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT