छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दहावी, बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम आता पूर्ण झाले आहे. उत्तरांव्यक्तिरिक्त इतर मजकूर लिहिलेल्या उत्तरपत्रिका वेगळ्या काढण्यात आल्या आहेत. यामध्ये काही जणांनी वेगवेगळ्या स्वरुपाचे खुना केल्या आहेत. तर काही जणांनी मला पास करा अशी विनंती केलेली आहे. (12TH Board Answer Sheet)
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड हे जिल्हे येतात. या विभागात दहावी आणि बारावीच्या सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांच्या सुमारे २५ लाख उत्तरपत्रिका नुकत्याच तपासून पूर्ण झाल्या आहेत. (12TH Board Answer Sheet)
तपासणीदरम्यान काही उत्तरपत्रिका वेगळ्या काढण्यात आल्या. यात प्रामुख्याने हस्ताक्षर बदल, काही संकेतवजा खुणा केलेल्या उत्तरपत्रिका तसेच पास करण्याची विनंती केलेल्या उत्तरपत्रिकांचा समावेश आहे. काही उत्तरपत्रिकांमध्ये 'सर मी खूप गरीब आहे', मला पास करा अशी विनंती करण्यात आलेली आहे. तर काहींमध्ये गाणीही लिहिली गेलेली आहेत. (12TH Board Answer Sheet)
प्रामुख्याने असे प्रकार बारावीच्या पेपरमध्ये आढळून आलेले असल्याची माहिती बोर्डातील सूत्रांनी दिली. दरम्यान, याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते म्हणाले, असे प्रकार दरवर्षीच होतात. अशा उत्तरपत्रिका वेगळ्या काढल्या जातात. त्यावर समिती निर्णय घेते.
अधिक वाचा :