पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलीवूडचे अनेक सुपरस्टार्स आहेत ज्यांनी चित्रपट साइन करण्यापूर्वी आवडीची हिरोईन कास्ट करण्याची अट निर्मात्यांसमोर ठेवली आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान, अनिल कपूर, अक्षय कुमार यांचा या यादीमध्ये समावेश आहे.
या यादीत पहिले नाव येते सलमान खानचे. सलमान त्याच्या नायिका कोण असावी याबाबत खूप निवडक आहे. यापूर्वी असा दावा करण्यात आला होता की त्याने अनेक चित्रपटांमध्ये कतरिना आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना स्वतःच्या मर्जीने रोल मिळवून दिला होता.
या यादीत सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. चित्रपट साईन करण्यापूर्वी अमिताभ निर्मात्यांकडून रेखा किंवा परवीन बाबीला साइन करण्याची मागणी करत होते.
या यादीत आमिर खानचेही नाव आहे. तो फक्त त्याच्या इच्छित अभिनेत्रीसोबतच काम करतो आणि चित्रपट साईन करण्यापूर्वीच निर्मात्यांना कळवतात.
या यादीत अक्षय कुमारचं नाव येत नाही, तर ते कसं शक्य आहे? अक्षयने कतरिना आणि प्रियांकाला स्वतःच्या इच्छेनुसार अनेक चित्रपटांमध्ये भूमिका दिल्या आहेत.
फिल्म इंडस्ट्रीतील हेमन म्हणजेच धर्मेंद्र देखील या यादीचा एक भाग आहे. ते निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटात हेमा मालिनी यांना कास्ट करण्यास सांगायचे.
अभिनेता संजय दत्तचे नाव माधुरी दीक्षितसोबत जोडले गेले होते. यानंतर संजयने निर्मात्यांना विचारून माधुरीला अनेक चित्रपटात कास्ट केले.
या यादीत 'झक्कास' अभिनेता अनिल कपूरच्या नावाचाही समावेश आहे. माधुरीसाठी अनिलचेही हृदय धक धक करू लागले होते. दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. अनिल कपूरही माधुरीसाठी विशेषत: निर्मात्यांकडे जात असे.
'डिस्को डान्सर' अभिनेता मिथुन चक्रवर्तीने अनेक चित्रपटांच्या निर्मात्यांशी बोलून श्रीदेवीला साईन केले होते. त्यावेळी मिथुनची अशी हवा होती की, निर्माते इच्छा असूनही नकार देऊ शकत नव्हते.
'सिंघम' स्टार अजय देवगणने निर्मात्यांना विचारल्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये इलियानाला घेतले होते. या चित्रपटांमध्ये रेड आणि बादशाहो या चित्रपटांचा समावेश आहे.
हे ही वाचलं का?