नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या कामठी रोडवरील ऑटोमोटिव्ह चौकात रिकामा डिझेल टँकर गॅस कटरने कापत असताना डिझेल टँकचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर गॅरेजमधील दोघे गंभीररित्या जळाले आहेत. एस. एम.बॉडी वर्क्स या टँकर दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये हा स्फोट झाला.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सुखबलसिंग हरिदयालसिंग पहल (वय 49)असे आहे. तर तकदिरराज सुखदेव कांबळे (वय 35, र. जगदंबानगर), योगेश गणेश नरके (वय 34, रा. सहयोगनगर) असे असून हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हा एक अपघात असून यात कुठलाही घातपात नसल्याचे कपिल नगर पोलिसांनी सांगितले आहे. तातडीने अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. तिघांना गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघे जण 85 टक्के जळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अधिक वाचा :