

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा देशभरात थैमान पसरवलेले पहायला मिळत आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा या विषाणूच्या विळख्यात आले आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊंटवरून कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले असल्याची माहिती दिली.
अमिताभ बच्चन यांनी गेल्या काही दिवसांत ज्यांना ज्यांना भेटलो आहे अशा सर्व लोकांना त्यांची कोविड चाचणी करून घेण्यास सांगितले आहे. मात्र, सध्यातरी या अभिनेत्याशिवाय त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे दिसून आले आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मी नुकतीच कोविड पॉझिटिव्ह चाचणी केली आहे. माझ्या आजूबाजूला असणारे सगळे लोक. या सर्वांनी कृपया स्वतःची चाचणी करून घ्या. महानायकाच्या या ट्विटनंतर चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. या ट्विटच्या कमेंटमध्ये चाहते अमिताभ बच्चन यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारत आहेत. अनेक चाहत्यांनी अभिनेत्याला स्वतःची काळजी घेण्यास आणि लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त गेली आहे. बच्चन हे सध्या त्यांचा गेम शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये व्यस्त आहेत. या शोदरम्यान ते सतत नवीन लोकांना भेटत असतात.
2020 मध्ये देखील अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते. यावेळी त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यादरम्यान बिग बींनी चाहत्यांसाठी एक पोस्ट केली.
हेही वाचा