‘आम्ही जरांगे’…मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच

amhi jarange
amhi jarange
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित 'आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा' हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा लोगो लाँच करण्यात आला.

'आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सुरेश पंडित यांचे असून मागील शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी असणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच "गरजवंत मराठ्यांचा लढा" हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.

त्यामुळे अर्थातच 'आम्ही जरांगे' या चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रदर्शना आधीपासूनच शिगेला पोहचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news