Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुटूंबियासह घेतले जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन

Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुटूंबियासह घेतले जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन

Published on

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी (दि. २१) महाराष्ट्राचे कुलदैवत श्री. खंडोबाचे सहकुटुंब मनोभावे दर्शन घेतले. शिवसेनेच्या लढाईत यश मिळू दे, अशी प्रार्थना त्यांनी केली. Ambadas Danve

संबंधित बातम्या

अंबादास दानवे यांचे चिरंजीव चिरंजीव धर्मराज व स्नुषा रश्मी यांच्या विवाहानंतर नवजोडप्याने मल्हारी मार्तंड यांच्या चरणी नतमस्तक होणे परंपरा आहे. त्याचा आदर ठेवत त्यांनी या परंपरेची जपणूक केली आहे. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, महिला आघाडी जिल्हा संघटक अरुणा हरपाळे, युवा सेना तालुकाप्रमुख वैभव कोलते, जेजुरी शहरप्रमुख किरण दावलकर, अमित पवार, महेश स्वामी व सुदाम शिनगारे उपस्थित होते. Ambadas Danve

धर्म परंपरेला साक्ष मानून वैवाहिक आयुष्यास सुरुवात केलेल्या या दापत्यांचे आयुष्य सुख- समाधानाने जाऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. तसेच पारिवारिक प्रसंगानिमित या शक्तिस्थळी आलो असलो तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्मासाठी सुरू केलेल्या लढाईस यश मिळू दे, अशी मल्हारी मार्तंड यांच्या चरणी अंबादास दानवे यांनी प्रार्थना केली.

दरम्यान, अंबादास दानवे परिवाराच्या वतीने खंडोबा देवाचे दर्शन, कुलधर्म कुलाचारनुसार तळी भंडारचा विधी करून भंडाराची उधळण केली. यावेळी दानवे यांनी ४२ किलो खंडा तलवार उचलून शक्तीचे प्रदर्शन केले. श्री. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने विश्वस्त मंगेश घोणे यांनी अंबादास दानवे यांचा खंडोबा देवाचा फोटो देवून सन्मान केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news