Latest
दहशतवादविरोधी पथकाकडून अंबाबाई मंदिर सुरक्षेचा आढावा
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य दहशतवादविरोधी पथकाचे अधीक्षक जयंत मीना यांनी मंगळवारी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर सुरक्षेचा आढावा घेतला. सकाळी 9.30 ते 11 या वेळेत त्यांचे पथक मंदिरात होते. मंदिर व परिसरातील पाहणी केल्यानंतर मंदिर प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली.
मंदिरातील अंतर्गत व बाह्य सुरक्षेविषयी त्यांनी चर्चा केली. सीसीटीव्ही यंत्रणा व सीसीटीव्ही कंट्रोल रूम यांची पाहणी केली. बैठकीदरम्यान भविष्यात सुरक्षेविषयी घ्यावयाच्या काळजीबाबतचे मार्गदर्शन केले. डिजिटल सुरक्षा साधने, बॅगांचे स्कॅनिंग मशिन, आधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसविण्यात येणेबाबत सूचना केल्या.
यावेळी देवस्थान समिती व्यवस्थापक महादेव दिंडे, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक किशोर डोंगरे, उदय पोवार, राहुल जगताप, राजू कांबळे उपस्थित होते.

