Amarnath Yatra 2024: गुड न्यूज ! अमरनाथ यात्रेचे बुकिंग उद्यापासून, ‘या’ तारखेपासून होणार प्रारंभ

Amarnath Yatra 2024
Amarnath Yatra 2024
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशभरातील भाविक आणि यात्रेकरूंचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणूक संपन्न होताच प्रशासनाने संपूर्ण लक्ष अमरनाथ यात्रेवर केंद्रीत केले आहे. यासाठी ॲडवान्स बुकिंग नावनोंदणी उद्या सोमवार १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. याची नोंद घेण्याचे आव्हान श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने केले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने सोशल मीडिया एक्सवरून दिले आहे. (Amarnath Yatra 2024)

एएनआयने वृत्तात म्हटले आहे की, यावर्षी २०२४ ची अमरनाथ यात्रा २९ जून २०२४ पासून सुरू होईल आणि १९ ऑगस्ट २०२४ रोजी संपेल. यात्रेसाठी ॲडवान्स बुकींग उद्या दि. १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. यावेळी जुलै महिन्यात बाबांच्या आरतीचे थेट प्रक्षेपण गुहेतून होणार आहे. नोंदणीसाठी अधिकृत असलेल्या बँकांच्या शाखांबद्दल तपशीलवार माहिती लवकरच दिली जाईल. नोंदणीसाठी आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आरोग्य प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या रुग्णालये आणि डॉक्टरांच्या पथकांची यादी जाहीर केली जाईल, असे देखील मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Amarnath Yatra 2024)

Amarnath Yatra 2024: काय आहे अमरनाथ यात्रेचे महात्म्य

गुहेत तयार होणार्‍या शिवलिंगाचे भाविकांना मोठे आकर्षण असते. या गुहेत शिवलिंगाबरोबरच दोन लहान बर्फाची पिंड तयार होते आणि त्यास पार्वती आणि श्री गणेश याचे प्रतीक मानले गेले आहे. गुहेच्या छताला असलेल्या एका भेगातून पडणार्‍या पाण्याच्या थेंबापासून शिवलिंग नैसर्गिक रूपाने तयार होते. अमरनाथ गुहेतील शिवलिंग हे चंद्राच्या प्रकाशाच्या आधारावर वाढते आणि कमी होते. अशा प्रकारचे जगातील एकमेव अद्वितीय शिवलिंग आहे. अमरनाथ यात्रेत भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून व्यापक तयारी केली जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news