Panjab Election : अमरिंदर सिंग यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

Panjab Election : अमरिंदर सिंग यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचा ( Panjab Election )  निकाल येत्या गुरुवारी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (amarinder singh) यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (home minister amit shah) यांची भेट घेत पुढील रणनितीवर चर्चा केली. निकाल हाती आल्यावर शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा होईल, असे सिंग यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

''माझ्या पक्षाने निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. भाजपनेही चांगली कामगिरी केली आहे. पुढे काय होते, ते पाहू य'' अशी टिप्पणीही सिंग यांनी केली. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी ( Panjab Election ) गत महिन्यात निवडणूक झाली होती. 2017 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या तर तत्कालीन अकाली दल – भाजप युतीला अवघ्या 18 जागा जिंकता आल्या होत्या. तर आम आदमी पक्षाला 20 जागा मिळाल्या होत्या. यावेळी आप सोबत इतर पक्षांनी काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण केले होते.

दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ( Panjab Election ) एकूण 68.30 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये 77.4 टक्के मतदान झाले होते.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा मतदारसंघ असलेल्या पतियाळा येथे 59 टक्के, मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांच्या चमकौर साहिब मतदारसंघात 68 टक्के तर भदौड मतदारसंघात 71.30 टक्के मतदान झाले आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्या जलालाबाद येथे 71.50 टक्के मतदान झाले. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या धुरी मतदारसंघात 68 टक्के मतदान झाले आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या नवीन पक्ष पंजाब लोक काँग्रेस (PLC) स्थापना करुन भाजपसोबत युती करत पंजाबच्या निवडणुकीस सामोरे गेले. पंजाब लोक काँग्रेस भाजपसोबत युती करून पंजाबची निवडणूक लढवेल अशी घोषणा त्यांनी पक्ष स्थापने वेळी केली होती.

सिद्धूंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी मतभेद झाल्याने अमरिंदर सिंग यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्ष सोडला होता. यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला होता. एवढेच नाही तर अमरिंदर सिंग भाजप नेत्यांच्या सतत संपर्कात होते. त्यामुळे ते भाजपशी युती करतील हे स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news