Latest
फुलेनगर आरटीओत मकर संक्रांतीच्या दिवशी अग्नितांडव; जप्त केलेली दहा वाहने जळून खाक
पुणे; पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयाच्या आवारामधे जप जप्त केलेली दहा वाहने मकर संक्रातीच्याच दिवशी जळून खाक झाली आहेत. कार्यालयाला रविवारमुळे आणि मकर संक्रातीमुळे सुट्टी होती. त्यामुळे आग लागल्याचे कारण अद्यापपर्यंत समजले नाही.
या आगीत ०४ कार, ०४ लक्झरी बस, ०१ टेम्पो व ०१ डंपर अशी एकूण १० वाहने पेटल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण मिळवण्यात आले असून, या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. फक्त वाहनांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापपर्यंत समजले नसल्याचे अग्निशामक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

