

कोलकाता : वृत्तसंस्था : कोलकात्यासह पश्चिम बंगालमधील सर्व जिल्ह्यांतून अॅडेनो व्हायरसची साथ पसरली आहे. या साथीत आतापर्यंत १२ मुलांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या संकटातून सावरत नाहीत तोवर अॅडेनो व्हायरस बंगालला हादरवून सोडले आहे. आयसीएमआर एनआयसीईडीने बंगालमधील काही मुलांच्या चाचण्या घेतल्या. यातील श्वसन संसर्गाच्या किमान ३२% नमुन्यांमध्ये हा विषाणू आढळून आला.
• मुख्यतः मुलांना लक्ष्य करतो
• सौम्य सर्दी किंवा फ्लूसारखे वाटणे
• हिवाळ्याचा उत्तरार्ध, वसंत ऋतूची सुरुवात अनुकूल
• ऊर्यास्वती रॉय चौधरी या १३ वर्षांच्या मुलीला १५ फेब्रुवारी रोजी श्वास घेण्यात त्रास होत होता. तापही आला होता.
• तपासणीअंती अॅडेनो व्हायरस पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. २३ रोजी मरण पावली.