

सातारा: पुढारी वृत्तसेवा
गुणरत्न सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आता सातारा पोलीस स्टेशन कोठडीतून न्यायालयात दाखल करण्यात येत आहे. डॉक्टरांनी पोलिस ठाण्यात येऊनच त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर त्यांची तब्येत उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असून, त्यांची अजूनही पोलीस कोठडी वाढवून मागणार असल्याची माहिती सातारा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांची आज सातारा पोलीस कोठडी संपणार असून, पोलीस आज सदावर्तेंना न्यायालयात हजर करणार आहेत. आत्तापर्यंत सदावर्तेंविरोधात पुणे, कोल्हापूर, अकोला आणि बीडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.