

पुढारी ऑनलाईन डेस्क; बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gil) याची डेटिंग चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगू लागली आहे. याआधी शुभमनचे नाव बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरशी जोडले जात होते. परंतु, मध्यतरी त्याच्या रिलेशनशिपबद्दल कोणतीच माहिती मिळाली नाही. तर सध्या सारा आणि शुभमन ( Sara Ali- Shubman) एकत्र असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल आला आहे.
काही दिवसापूर्वी अभिनेत्री सारा अली खान आणि शुभमन (Sara Ali- Shubman) यांना मुंबईतील एक प्रसिद्ध रेस्टारेटमध्ये पाहिलं गेलं. यानंतर दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगू लागल्या. याच दरम्यान सारा किवा शुभमन दोघांनीही याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, दोघांना पुन्हा एकदा विमान तळावर स्पॉट झाले आहेत.
यावेळी शुभमन बॅग घेवून साराच्या बाजूने फास्ट निघून जाताना दिसला आहे. तर सारा विमान तळावरील एका चाहत्यासोबत फोटो क्लिक करताना दिसली आहे. याशिवाय सारा विमानातील एका आसनावर जावून बसल्याचे दिसते. यावरून चाहत्यांनी दोघेजण कोणीकडे जात आहेत काय?, का सारा एकटीच शुंटिगला जात आहे? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. सारा आणि शुभमन दोघेजण एकाच वेळी स्पॉट झाल्याने त्याच्या डेटिंगच्या चर्चाना उधान आलं आहे.
हेही वाचलंत का?