

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा ( Minissha Lamba ) गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीजपासून दूर आहे. बॉलिवूडपासून दूर राहिल्यानंतर मिनिषा तिच्या कुटुंब आणि पतीसोबत टाईम स्पेंड करत होती. आता मिनिषाने तिच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज दिली आहे. यात ती पुन्हा एकदा पडद्यावर वापसी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
दीर्घ काळानंतर मिनिषा ( Minissha Lamba ) छोट्या पडद्यावर वापसी करत असल्याने तिच्या चाहत्याचा आनंद द्विगुणीत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २००५ सालच्या 'यहाँ' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री मिनिषा आता अॅमेझॉन मिनीवर टीव्ही मालिका 'बदतमीज दिल' मध्ये दिसणार आहे. दीर्घ कालावधीनंतर मिनिषा इंडस्ट्रीजमध्ये पुनरागमन करत आहे.
मुंबईत मालिका 'बदतमीज दिल' च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान मिनिषाच्या नव्या मालिकेतील एन्ट्री आणि मालिकेबद्दल सांगितले आहे. 'मला सेटवर परत आल्याने आनंद झाला आहे. ब्रेकदरम्यान नविन काहीतरी घडवण्याचा प्रयत्न सतत मनात होता. फक्त मी योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. आता ती पुर्ण झालीय. माझा लवकरच 'बदतमीज दिल' मालिकेतून चाहत्याच्या भेटीस येत आहे.' असेही तिने सांगितले आहे.
मालिकेविषय़ी बोलताना मिनिषा म्हणाली की, 'बदलमीज दिल' मालिकेत शाळेच्या दिवसांच्या रोमान्सवर विश्वास ठेवणाऱ्या मुलीचा आणि आधुनिक काळातील प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या मुलाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. मिनिषासोबत मालिकेत मल्लिका दुआ, बरुण सोबती आणि रिद्धी डोगरा यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा :