Aahana Kumra : ‘तो’ आला अन्…भडकलेल्या आहानाने म्हटलं ‘डोन्ट टच मी’

Aahana Kumra
Aahana Kumra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'रंगबाज' फेम बॉलिवुड अभिनेत्री आहाना कुमरा ( Aahana Kumra ) तिच्या अनेक हिट चित्रपटातील दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आहाना तिच्या एकापेक्षा एक हॉट फोटोज क्लिक करून सोशल मीडियावर सक्रिय असते. याच दरम्यान आहानाचा कार्यक्रमातील एका फॅन्सच्या हरकतीवर भडकत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात आहाना कुमरा (Aahana Kumra) ने हजेरी लावली होती. यावेळी ती ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत होती. मोकळ्या केसांची स्टाईल, कानात इअररिग्स, हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या कार्यक्रमातील खास फोटो आहानाने तिच्या इंन्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दरम्यान तिचा आणखी एक कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आहानासह इतर अनेक सेलेब्रिटी या कार्यक्रमात पोहचल्यानंतर पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला पोझ देत होते. यावेळी आहानाही एकापेक्षा एक हॉट पोझ देत होती. दरम्यान आहानाच्या फॅन्सनी तिच्यासोबत फोटो काढण्यास सुरूवात केली. मात्र, एका फॅन्सने फोटो काढताना आहानाच्या कमरेवर चुकून हात ठेवला. यानंतर आहाना मात्र, त्याच्यावर खूपच भडकली आणि 'डोन्ट टच मी' असे म्हणत बाजूला झाली. यानंतर लगेच ही बाब फॅन्सच्या लक्षात येताच त्याने तिला 'सॉरी' म्हणत माफी मागितली. या घटनेनंतर दोघेही या कार्यक्रमातून निघून गेले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पाडलाय. आहानासोबतची ही घटना काही पहिलीच नाही. तर चाहत्यांनी मर्यादा ओलांडल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत घटना घडल्या आहेत. आहाना गेल्या वर्षी 'सलाम वेंकी' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत काजोल आणि प्रकाश राज यांनी भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aahana S Kumra (@aahanakumra)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news