शशांक केतकर
शशांक केतकर

अभिनेता शशांक केतकर मुरांबा मालिकेचं शूटिंग करतोय थेट लंडनमध्ये!

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुरांबा मालिकेतील रमा-अक्षयच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अभिनेता शशांक केतकर सध्या लंडनमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असल्यामुळे मालिकेच्या कथानकात तो कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्याचं दाखवण्यात आलं आहे. फोनच्या माध्यमातून तो रमाच्या आणि कुटुंबियांच्या सतत संपर्कात असतो. फोनवरील संभाषणाचे हे सीन शशांक स्वत: त्याच्या मोबाईलवर शूट करतोय आणि तेही लंडनमधून. या सीन्सच्या निमित्ताने प्रेक्षकांनाही लंडनच्या नयनरम्य ठिकाणांचं दर्शन होत आहे. याआधीही शशांकने मुरांबा मालिकेसाठी असे सीन शूट केले होते.

परदेशातील शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगताना शशांक म्हणाला, 'मला झोकून देऊन काम करायला आवडतं. प्रोजेक्ट कुठलंही असो मी माझे शंभर टक्के देतो. जेव्हा स्टार प्रवाहसारखी वाहिनी, पॅनोरमा सारखं प्रोडक्शन हाऊस, सहकलाकार आणि पडद्यामागची संपूर्ण टीम जेव्हा मला माझ्या नव्या प्रोजेक्टसाठी सहकार्य करतात तेव्हा माझीही जबाबदारी असते की मी देखिल माझ्या टीमला संपूर्ण सहकार्य करायला हवं. त्यामुळेच मुरांबा मालिकेचे काही सीन्स मी परदेशातून माझ्या मोबाईलवरुनच शूट करायचं ठरवलं.

मालिकांचं बरचसं शूटिंग मुंबईमध्ये होतं. परदेशातलं लोकेशन जर मालिकेत दिसलं तर प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असते. त्यामुळेच प्रेक्षकांसाठी मी मुरांबा मालिकेसाठी काही सीन्स शूट करुन पाठवतोय. मायदेशी मी लवकरच परतणार आहे. तेव्हा पुन्हा भेटुच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news