Salman Khan : सलमानच्या मेकअप आर्टिस्टवर हल्ला; रॉडने मारहाण

salman khan
salman khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आणि सर्वाचा लाडका भाईजान म्हणजे, सलमान खानला ( Salman Khan ) कोण ओळखतं नाही. त्याचे सोशल मीडियावर खूपच फॅन फोलोव्हर्स आहेत. सलमानची चित्रपटातील एक झलक पाहण्यास नेहमी चाहत्याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. मात्र, सध्या सलमान वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याच्या मेकअप आर्टिस्टवर नुकताच लोखंडी रॉड आणि दगडाने प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्यात मेकअप आर्टिस्ट जखमी झाला असून त्यांना उपचापरासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्यात जखमी झालेल्या मेकअप आर्टिस्टचे नाव पलेश्वर चव्हाण असे आहे. ( Salman Khan )

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा मेकअप आर्टिस्ट पलेश्वर चव्हाण हा त्याच्या एका फिल्म्सच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत होता. दरम्यानच त्याची आणि मॅनेजर सतीश शेट्टी यांची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत सतीशने सुरूवातील पलेश्वरकडून काही पैसे उधारीवर घेतले. ते पैसे काही दिवसाने त्याला परत केले.

यानंतर सतीशने मेकअप आर्टिस्टकडून ३ लाख रूपये उधारीवर पैसे घेतले. काही दिवसांनंतर मेकअप आर्टिस्ट पलेश्वरने आपली रक्कम परत मागण्याचा त्याच्याकडे तगादा लावला. यानंतर सतीशच्या साथीदारांनी त्याला मुंबईत रात्री लोखंडी रॉड आणि दगडाने प्राणघातक हल्ला केला. या हल्यात तो जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान पोलिसांनी मॅनेजर सतीशसह त्याच्या साथीदाराविरुद्धात तक्रार दाखल केली आहे.

अशी घटना घडली

३२ वर्षीय मेकअप आर्टिस्ट पलेश्वरने सांगितले की, सांताक्रूझ येथील एका बारमध्ये रात्री १० च्या सुमारास उधारीचे पैसे मागण्यासाठी गेलो होतो. यावेळी सतीश शेट्टीने मला दोन ते तीन तास वाट पाहायला लावली. त्यानंतर बार बंद झाला असून 'नंतर ये' असे सांगितले. मात्र, मी तेथून गेलो नाही. त्यानंतर रात्री १ वाजण्याच्या सुमारास सतीशने माझ्याशी वाद घातला. या वादानंतर सतीशने त्याच्या साथीदारांना बोलावून लोखंडी रॉड, विटा आणि दगडाने मारहाण केल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news