Actor Sahil Khan
Actor Sahil Khan

Actor Sahil Khan : साहिल खानने अटकेपासून वाचण्यासाठी वेशांतर करत तब्बल १८०० किमीचा केला प्रवास

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अटकेपासून वाचण्यासाठी अभिनेता साहिल खानने चार दिवसात ५ विविध राज्यांमध्ये १८०० किलोमीटरचा प्रवास केला होता. शनिवाराी पोलिसांनी त्याला छत्तीसगडमधील जगदलपूरमधून पकडले. साहिल खान २५ एप्रिलला मुंबईतून बाहेर निघून गेला. यावेली तो गोवा, कर्नाटक हुबळी आणि हैदराबादमध्ये पोहोचला. (Actor Sahil Khan) ओळख लपवण्यासाठी त्याने वेशांतर केले आणि साधे कपडे घातले. जेव्हा तो हैदराबादमध्ये होता, तेव्हा पोलिसांनी त्याचे ठिकाण ट्रॅक केले. त्याने तिथूनही पळ काढत छत्तीसगडला गेला. (Actor Sahil Khan)

'स्टाईल' आणि 'एक्सक्युज मी' यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका करणाऱ्या साहिल खानने रात्रीच्या वेळी छत्तीसगडच्या माओवादी क्षेत्रातून प्रवास करण्याचे ठरवले. आणि तेथूनच गाडी चालवण्यासाठी गाडी चालकाला भाग पाडले. पोलिसांनी त्याला जगदलपूरच्या एका हॉटेलमधून ताब्यात घेतले.

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी साहिल खानवर आरोप आहे की, तो एक प्रमोटर म्हणून ॲपला अन्य वेबसाईटवर प्रमोट करत होते. सोबतच त्याच्यावर लायन बूक आणि लोटस 24*7 यासारख्या सट्टेबाजी ॲप्स, जे महादेव ॲपशी संबंधीत आहेत, त्याचा प्राचार केल्याचाही आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news