Priyanka Chopra-nick jonas with malti
Priyanka Chopra-nick jonas with malti

Priyanka Chopra : जय श्रीराम! प्रियांका चोप्रा, निक जोनास सहकुटुंब अयोध्येत, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा, पती आणि गायक निक जोनास आणि त्यांची मुलगी मालती मेरी जोनास यांनी आज बुधवारी (दि.२०) अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.

काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा भारतात परतली होती. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनससह अयोध्या विमानतळावर उतरली. तिने पती आणि मुलगी मालती मेरीसह रामललाचे दर्शन केले. या दरम्यान राम मंदिर ट्रस्टचे सदस्य डाक्टर अनिल मिश्र यांनी तिचे सहपरिवार स्वागत केले. यावेळी ती खूप भावूक झाली. तिने यावेळी आपले जीवनाचे सौभाग्य असल्याचे सांगितले.

प्रियांका यावेळी ट्रॅडिशनल अवतारात दिसली. यावेळी विमानतळावर लोकांनी 'जय श्री राम'च्या नावाचा जयघोष केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news