

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा
सोलापूर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावर अकरा मैल ते तेरा मैल च्या दरम्यान कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातामध्ये अर्चना दशरथ मरीआई वाले (वय 23) या महिलेचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये सहा लहान मुले आहेत तर 8 प्रौढ व्यक्तींचा समावेश आहे. या आठ जणांपैकी सात महिला एक पुरुष आहे.
रिक्षा क्रमांक एमएच १३ सीटी ५६४९ आणि कार क्रमांक एमएच १५ जीएल १४२२ यांची चौधरी हॉस्पिटल जवळ आल्यानंतर धडक झाली. रिक्षातील सर्व प्रवासी हे आपल्या गावी जात होते.
जखमींमध्ये शंकर मरीआईवाले (वय 30), तानु संजय मरीआईवाले (वय 25), गीता विजय मरीआईवाले (वय 30), नकुशा संजय मरीआईवाले (वय 30), अंकुश राठोड (वय 25) , संगीता लखन मरीआईवाले (वय 20), जयश्री संजय मरीआईवाले (वय 18), रेश्मा भारत मरीआईवाले (वय 24) या महिलांचा समावेश आहे
तर संस्कार मरिआई वाले (वय 2), नितीन शंकर मरीआई वाले (वय 1 वर्ष), आयुष्या संजय मरीआई वाले (4 वर्षे), अंकिता भगवान मरीआई वाले (वय 3), आरती पोपट मरिआई वाले (वय 2), दीपक भगवान मरीआई वाले (वय 4), या लहान मुलांचा समावेश आहे.
अपघातग्रस्त रिक्षातील सर्व जखमी हे मंद्रूप येथील रहिवासी आहेत, घटनेची खबर कळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. यामधील दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा