aboli tv serial
Latest
अबोली मालिका : वर्षाच्या लीपनंतर अबोली आणि अंकुशची होणार का भेट?
पुढारी ऑनलाईन डेस्क : अबोली मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आलंय. काही दिवसांपूर्वीच अंकुशचा अपघात झाला. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या अपघातात अंकुशचे निधन झाल्याचं जरी सांगण्यात आलं असलं तरी अंकुश जिवंत असल्याचा ठाम विश्वास अबोलीला आहे. अंकुशच्या वाटेकडे ती डोळे लावून बसली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी अंकुशच्या दीर्घायुष्यासाठी तिने प्रार्थना केली आहे. अबोलीचं हे निस्सीम प्रेम तिची आणि अंकुशची भेट घडवून आणेल का, याची उत्सुकता वाढली आहे.
मालिकेच्या कथानकाने एक वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे अंकुश आणि अबोलीमधील विरहाला एक वर्ष उलटून गेलं आहे. त्यामुळे अबोली-अंकुशची भेट व्हावी ही प्रेक्षकांचीदेखील इच्छा आहे. ही भेट होणार की मालिकेचं कथानक नाट्यमय वळण घेणार हे अबोली मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.

