Actor Aamir Khan: आमिर खानने हटवला सोशल मीडियावरील ‘तो’ व्हिडिओ
पुढारी ऑनलाईन: बॉलीवूड स्टार अमिर खानने बुधवारी त्याच्या चुकीबद्दल त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या सह्याने त्याने आपल्या चाहत्यांची 'मिच्छामी दुक्कड़म' असे म्हणत माफी मागितली होती. ( Actor Aamir Khan ) परंतु या सोशल मीडियावरील व्हिडिओवर युजर्संनी वेगाने कमेंट करत, आमीरच्या चुकांचा पाढा वाचायला सुरूवात केली. यानंतर लगेचच आमीर खामच्या सर्व सोशल मीडियावरून हा माफीनामाचा व्हिडिओ आता हटविण्यात आला आहे.
Actor Aamir Khan : काय होता व्हिडिओ ?
आमीर खानने एक व्हिडिओ शेअर करत, आपल्या चुकांची माफी मागितली होती. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असे म्हणत आहे की, "जर कधीही मी कोणत्याही प्रकारे तुमचे मन दुखावले असेल तर मन, विचार आणि शरीराने मी तुमची माफी मागतो. अमीरने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडिया युजर्सही यावर वेगाने कमेंट करत आहेत. माफी मागितल्याने यूजर्सनी आमीरच्या चुकांचा पाढा वाचायला सुरू केला आहे.
का मागितली माफी ?
2022 मध्ये आमीर खान बॉलीवूड विश्वापासून काहीसा दूर गेलेला दिसत आहे. यामध्येच त्याचे चित्रपटदेखील फ्लॉप होत आहेत. आमीर खानची अलीकडिल चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' हा देखील फ्लॉप ठरला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या वादात सापडलेल्या अनेक चित्रपटांमध्ये आमिर खानचा लालसिंह चड्ढा हा चित्रपट अडकला आणि चाहत्यांनी या चित्रपट नाकारला, त्यामुळे आमीर खानने हा व्हिडिओ शेअर केला असावा असे दिसते.

