

सतीश डकरे, सनदी लेखपाल
पॅनला आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून होती. या महिन्याच्या अखेरीस आधार आणि पॅन लिंक न केलेल्या व्यक्तींना अनेक परिणामांना सामोरे जावे लागेल. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास अनेक व्यवहार करता येणार नाहीत. ( Aadhaar-PAN link ) आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, जर 30 जून 2023 पर्यंत आधार पॅनशी लिंक केले नाही, तर तुमचे पॅन निष्क्रिय होईल. पॅन निष्क्रिय झाले, तर तुम्ही ते कुठेही सादर करू शकणार नाही. त्याची माहिती देऊ शकणार नाही किंवा कोट करू शकणार नाही. याबाबत कायद्याच्या अंतर्गत होणार्या सर्व परिणामांना संबंधित व्यक्ती जबाबदार असेल.
प्राप्तिकर नियम, 1962 च्या नियम 11AAA मधील तरतुदी शिथिल करण्याच्या संदर्भात स्पष्टीकरणावरील अधिसूचनेनुसार, 30 मार्च 2022 रोजी कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) निष्क्रिय करण्याची पद्धत विहित केली आहे. ( Aadhaar-PAN link )
आयकर वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, पॅन-आधार लिंक न केल्यामुळे पॅनकार्डधारकांना पुढील परिणामांना सामोरे जावे लागू शकते.