

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल सांगता येत नाही. दोन दिवसांपासून एक मुलगा हलगी ठेक्यावर डान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळालेली नाही पण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अनेकांनी हा व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्रामवरती शेअर केला आहे. अनेकांनी या व्हिडिओला वेगवेगळ्या कॅप्शन दिल्या आहेत. काही युजर्संनी याला, असं मनसोक्त जगता आल पाहिजे अशी कॅप्शन दिली आहे. तर काहींनी बेधुंद ठेका अशी कॅप्शन दिली आहे. लहानपणीचे हे दिवस पुन्हा परत येतील का अस एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. हलगीचा नाद… आयुष्यात कितीही टेन्शन असलं तरी लहान होऊन अस नाचता आलं पाहिजे. अस एका युजरने म्हटलं आहे.
या व्हिडिओत एक १२ ते १४ वर्षाचा मुलगा मैदानावरील बॅरिगेटवरती हलगीच्या ठेक्यावर डान्स करत असल्याच दिसत आहे. यात त्याने हलगीच्या ठेक्यावर वेगवेगळ्या पध्दतीने त्याच्या चेहऱ्यावरील अदांनी अनेकांना भुरळ घातली आहे. अनेकांच्या व्हॉट्स अॅप तसेच इन्स्टाग्राम स्टेटसवरती हा व्हिडिओ पाहायला मिळाला आहे.
या व्हिडिओत दिसणारा मुलगा हा खेळाडू असल्याचं दिसत आहे. एका मैदानावरती ही मुल विजयाचा जल्लोष करत असल्याच दिसत आहे.
हेही वाचलत का?