file photo
Latest
सहा वर्षांच्या मुलाला नेले गुलबर्ग्याला पळवून
पुणे : पुणे स्टेशन परिसरातून सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणार्याला पोलिसांनी पकडून अपह्रत मुलाची सुखरूप सुटका केली. इक्बाल हसन शेख (वय 32, रा. पेडगाव, जि. कोल्हापूर, सध्या रा. गुलबर्गा रेल्वे स्टेशनजवळ, कर्नाटक) असे मुलाला पळवून नेणाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका 40 वर्षांच्या महिलने फिर्याद दिलीे.
दारूचे नशेत एकाने महिलेच्या 6 वर्षांच्या मुलाला पळवून नेले. पोलिसांनी केलेल्या तपासात हा मुलाला गुलबर्गा येथे नेल्याचे आढळून आले. पुणे पोलिसांनी गुलबर्गा पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करून मुला सुटका केली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप मधाले तपास करीत आहेत.

