

नवी दिल्ली : एकापेक्षा एक अचाट साहसे प्रत्यक्षात साकारण्याबाबत भारतीय देखील फारसे मागे नाहीत, असे गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्मधील आणखी एका विक्रमाने अधोरेखित झाले आहे. विस्पी खराडी या वीराने यावेळी केवळ एका मिनिटात डोक्याने लोखंडी सळी वाकवण्याचा पराक्रम केला असून त्याच्या या विक्रमाची गिनिज रेकॉर्डसने दखल घेतली आहे.
या व्हिडीओत विस्पी खराडीने एकानंतर एक असे काही लोखंडी सळी डोक्यावर घेऊन दोन्ही हातांनी ताकद लावत ती वाकवल्याचे दिसून येते. या व्हिडीओच्या शेवटी त्याला गिनीज रेकॉर्डसकडून विक्रमाचे सर्टिफिकेट दिल्याचाही संदर्भ घेण्यात आला आहे.
विस्पी खराडी हा आजवर अशी अनेक साहसी उपक्रम राबवत आला आहे. यंदा फेब्रुवारीत इटलीतील लो शो देई रेकॉर्डच्या व्यासपीठावर विस्पीने डोक्याने लोखंडी सळी वाकवण्याचे स्टंट साकारून दाखवले होते. त्याचा व्हिडीओ या आठवड्यात उपलब्ध करून देण्यात आला. आतापर्यंत 39 हजार जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून नेटिझन्सनी त्याचे बरेच कौतुक केले आहे.