शिंगवे येथे आढळला दुर्मिळ “पोवळा”साप

शिंगवे येथे आढळून आलेला "पोवळा" जातीचा दुर्मिळ साप. (छाया : किशोर खुडे
शिंगवे येथे आढळून आलेला "पोवळा" जातीचा दुर्मिळ साप. (छाया : किशोर खुडे
Published on
Updated on

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: शिंगवे (ता. आंबेगाव) येथे दुर्मिळ "पोवळा" जातीचा साप आढळून आला आहे. निसर्गमित्र दत्तात्रय राजगुरु यांनी सापाला सुरक्षित त्याच्या अधिवासात सोडून दिल्याची घटना ६ नोव्हेंबरला सकाळी घडली.  रत्नाकर पांडुरंग वाव्हळ यांच्या घराच्या ओट्यावर त्यांचे नातू व मुलगा सागर वाव्हळ हे बसले असता त्यांना लहान आकाराचा साप ओट्याच्या फरशीवर दिसून आला. साप लहान आकाराचा असल्याने त्यांनी चिमट्याने अलगद पकडून प्लास्टिक बरणीत ठेऊन निसर्ग अभ्यासक दत्तात्रय राजगुरव, शारदा राजगुरव यांना सापाची ओळख करून घेण्यासाठी दाखवण्यास घेऊन गेले. तो साप "पोवळा" या जातीचा दुर्मिळ विषारी साप असल्याचे सांगितले .

पोवळा सापास "रातसर्प", काकसर्प या नावानेही ओळखले जाते. हा अतिशय दुर्मिळ असून तो शिंगवे परिसरात दुसर्‍यांदा आढळल्याची नोंद आहे. हा साप मातकट, खाकी रंगाचा असुन पोटाखालील बाजूस लालसर गुलाबी रंगाचा असतो. तोंड काळ्या रंगाचे व शेपटी थोडी बोथट असून शेपटीवर दोन काळे पट्टे असतात. पाला-पाचोळ्यात तिन ते सहा अंडी घालतो. हा साप साधारण पंधरा ते अठरा इंचापर्यंत वाढतो. हा एकदम सडपातळ असणारा साप डिवचल्यास शेपटीकडील भाग अंगठीसारखा गोल करून शेपटीखालील भगवा रंग दाखवून शत्रूचे लक्ष विचलीत करून स्वतःचे डोके व जीव वाचवतो. या सापाचे विष नाग, मण्यार या सापांच्या विषाप्रमाणे मनुष्याच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते.

थंडीच्या दिवसात या सापाचा वावर दिसून येतो. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारीत शेड्युल दोनमध्ये त्याचा सामावेश करण्यात आला आहे. हा नामशेष होण्याच्या मार्गावर असून याच्या चाव्यापासून भारतात मृत्यूची नोंद नाही. निसर्गमित्र दत्तात्रय राजगुरव यांनी त्या सापास सूरक्षीत त्याच्या अधीवासात मनुष्यवस्तीपासून दूर नेऊन मूक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news