रायगड : कामोठ्यात फिल्‍मी स्‍टाईल दरोडा; चोरट्यांकडून शेजारच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड अन्…

फिल्‍मी स्‍टाईल दरोडा
फिल्‍मी स्‍टाईल दरोडा
Published on: 
Updated on: 

पनवेल ; पुढारी वृत्‍तसेवा : कामोठे सेक्टरमधील बसंत बहार सोसायटीमध्ये असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्समध्ये काल (रविवार) संध्याकाळी धाडसी दरोडा टाकण्यात आला. अगदी फिल्मी स्टाईलने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. चोरट्यांनी शेजारील दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून गॅस कटरने तिजोरी फोडली. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, कामोठे सेक्‍टरमध्ये लक्ष्मी ज्‍वेलर्स नावाचे ज्‍वेलरी शॉप आहे. या दुकानावर चोरट्यांनी संध्याकाळी धाडसी दरोडा टाकला. यासाठी चोरट्यांनी ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी असलेल्या एका खानावळ दुकानातील कॉमन भिंतीला भगदाड पाडून चोरटे सोनाराच्या दुकानात शिरले. यानंतर चोरट्‍यांनी गॅस कटरच्या मदतीने ज्वेलर्स दुकानातील तिजोरी फोडली.

तिजोरीतील चांदी आणि सोन्यावर चोरट्याने डल्ला मारून चोरटे फरार झाले. या दरोड्यामध्ये जवळपास 10 किलो चांदी चोरल्‍याचे समोर आले आहे. ही घटना घडल्यानंतर कामोठे पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news