

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध कन्नड अभिनेता उपेंद्र सध्या वादात सापडला आहे. फेसबुक लाईव्ह कार्यक्रमादरम्यान एका समाजाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी उपेंद्र यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे.
उपेंद्र त्यांचा राजकीय पक्ष प्रजाकीयाच्या वर्धापनदिनानिमित्त फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाइव्ह होते. पक्षाबद्दल बोलत असताना त्यांनी एका समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले. याप्रकरणी त्यांच्यावर बेंगळुरूमधील चेन्नम्माना केरे अचुकट्टू पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
उपेंद्र यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात सर्वत्र निदर्शने झाली. यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ हटविला आणि माफी मागीतली. "मी आज फेसबुक आणि इंस्टाग्राम लाईव्ह ब्रॉडकास्टमध्ये एक म्हण वापरली होती. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे समजताच, मी माझ्या सोशल मीडियावरून तो लाइव्ह व्हिडिओ डिलीट केला, या शब्दांबद्दल क्षमस्व," असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :