

पाटण : पुढारी वृत्तसेवा
पाटण तालुक्यातील मुदत संपलेल्या व काही महिन्यांत मुदत संपणार्या 91 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी सहा जून रोजी आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली.
जानेवारी 2021 ते एप्रिल 22 या काळात मुदत संपलेल्या व मे ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या तसेच निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या अशा एकूण 91 ग्रामपंचायत प्रभागांसाठी ही आरक्षण सोडत होणार आहे. ओबीसी तथा इतर मागासवर्गीय आरक्षण वगळून सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आरक्षण पद्धतीनुसारच ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवारी 6 जून रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक पातळीवर विशेष ग्रामसभा घेऊन प्राधिकृत अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर ही आरक्षण सोडत संपन्न होणार आहे. काही ठिकाणी दोन गावांसाठी एकच प्राधिकृत अधिकारी असेल अशा ठिकाणी एका गावाची सोडत सकाळी अकरा वाजता तर दुसर्या गावाची सोडत दुपारी दोन वाजता होणार असल्याचेही रमेश पाटील यांनी सांगितले .
पाटण तालुक्यातील मालदन, निवडे पुनर्वसन, येराड, आवर्डे, भारसाखळे, भोसगाव, भुडकेवाडी, ढोरोशी, गलमेवाडी, गारवडे, गोठणे, जाधववाडी, कोडोली, लेंडोरी, मणेरी, मराठवाडी, मारुल तर्फ पाटण, माथनेवाडी, म्हावशी, निसरे, निवकणे, शेडगेवाडी, शेंडेवाडी, शिरळ, ताईगडेवाडी, उरुल, आंबवडे खुर्द, आबदारवाडी, बीबी, चौगुलेवाडी (काळगाव), धडामवाडी, धायटी, गोकुळ तर्फ हेळवाक, हेळवाक, कळंबे, कारळे, केरळ, नाटोशी, राहुडे, वेताळवाडी, झाकडे , बनपुरी, घोट, घोटील, जळव, कडवे खुर्द, कराटे, मरळोशी, मारुल हवेली, नानेगाव बुद्रुक, पानेरी, रासाटी, सणबूर, शिवंदेश्वर, तोंडोशी, वेखंडवाडी, गिरेवाडी, गोवारे, नाव, बनपेठवाडी, दाढोली, डेरवन, पाडळोशी, बहुले, कडवे बुद्रुक, काठी, ढेबेवाडी, कुसवडे, मत्रेवाडी, सडावाघापूर, जाळगेवाडी, कोंजवडे, आडुळपेठ, ढाणकल, हुंबरवाडी, धजगाव, नाडे, आंब्रग, चाळकेवाडी, डिगेवाडी, आडुळ गावठाण, महिंद, माजगाव, नुने, साईकडे, घाणव, भिलारवाडी, सुतारवाडी, मान्याचीवाडी, मोरगिरी, साबळेवाडी या 91 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
पाटण तालुका हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. प्रामुख्याने विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायत ते पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांकडे पाहिले जाते. तालुक्यात देसाई व पाटणकर गट परस्पर विरोधी निवडणुका लढत आहेत.